अलीकडच्या काळात ट्रेडमार्क नोंदणीसंदर्भात फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. काही व्यक्ती लोकांना स्वस्तात व जलद ट्रेडमार्क नोंदणी करून देण्याचे आमिष दाखवतात — मात्र प्रत्यक्षात अर्जच भरला जात नाही.
🚩 फसवणूक कशी होते?
- वकील असल्याचे खोटे भासवत असतात, प्रत्यक्षात त्यांची कोणतीही नोंदणी नसते.
- काही वेबसाईट्स ट्रेडमार्क फाईलिंगचे आमिष दाखवून पैसे घेतात, पण Trademark Registry मध्ये अर्ज करत नाहीत. ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन न केल्यामुळे ब्रँडचे संरक्षण होत नाही.
- पैसे घेतल्यानंतर बनावट रिसीप्ट देतात पण खऱ्या अर्जाचा क्रमांक किंवा सरकारी पावती मिळत नाही.
- पेमेंट केल्यानंतर त्या व्यक्तीकडून संपर्क होणे बंद होते.
✅ फसवणूक टाळण्यासाठी मोफत सोप्या टिप्स.
- नेहमी बार कौन्सिल नोंदणीकृत असलेल्या वकिलांबरोबर व्यवहार करा.
- ट्रेडमार्क अर्ज झाल्यावर IP India कडून अधिकृत अर्ज क्रमांक (application number) मिळतो. www.ipindia.gov.in या वेबसाइटवर अर्जाची माहिती तपासा.
- फारच स्वस्त दर किंवा “झटपट सेवा” अशा आमिषांपासून दूर रहा.
ब्रँडसाठी शॉर्टकट घेऊ नका. केवळ प्रामाणिक आणि अनुभवी कायदेशीर सल्लागारांकडूनच सेवा घ्या.
कायदेशीर ट्रेडमार्क फाईलिंगच्या अधिक माहितीसाठी संपर्क:
ॲड. शैलेन्द्र देशपांडे
📞 +91 98900 32603
🌐 www.vandsassociates.in
नोट: वरील अनुभव सर्वसाधारण लोकांच्या माहितीसाठी दिलेला आहे.


